महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravati Gold Theft : दर्यापूरातील एका लग्न समारंभात 100 ग्रॅम सोन्याची चोरी; आरोपी फरार - दर्यापूर लग्नात सोन्याची चोरी

जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील माहेश्वरी भवन ( Daryuapur Gold Theft ) येथे एका लग्न समारंभात 4 लाख, 703 चे दागिने ( Gold Stolen In Marriage ) चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

Daryuapur Gold Theft
Daryuapur Gold Theft

By

Published : Feb 17, 2022, 3:17 PM IST

अमरावती -जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील माहेश्वरी भवन ( Daryuapur Gold Theft ) येथे एका लग्न समारंभात 4 लाख, 703 चे दागिने ( Gold Stolen In Marriage ) चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे दर्यापूर शहरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

अनोळखी युवक-युवतीने केला हात साप -

हळदीच्या कार्यक्रमापासून या लग्नसमारंभात अनोळखी युवक-युवती सहभागी झाले होते. आपण नवरदेवाकडचे असल्याचे हे दोघेही भासवत लग्न सोहळ्यात सामील झाले. नवरीच्या आत्याच्या अंगावर त्यांनी खाज सुटणारी वनस्पती लाऊन त्यांना सोने असलेल्या रूमच्या बाहेर व्यस्त ठेवले. संधी मिळताच मुलगी सोनं असलेल्या रूममध्ये जाऊन आम्ही नवरदेवाकडचे आहोत, त्यांनी सोन्याचे दागिने सांगितले आहेत, अशी बतावणी करून तिथून सोनं घेऊन पसार झाले.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल -

जवळपास 100 ग्राम सोने या दोघांनी लंपास केल्याचे काहीच वेळात समजलं आणि गोंधळ झाला. या घटनेची तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात युवक-युतीच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून व्हिडिओ कॅमेरा आणि फोटोग्राफरच्या कॅमेरात हे दोन्ही आरोपी कैद झाले आहे. तसेच माहेश्वरी भवनासमोर असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये ते दोघेही सोने घेऊन पसार होतानाचे दृश्य कैद झाले आहेत.

हेही वाचा -Dilip Yedatkar Criticize Navneet Rana : मतदारांची फसवणूक करणाऱ्या खासदारांनी काँग्रेस विरोधात बोलूच नये : काँग्रेस नेते दिलीप एडतकर

ABOUT THE AUTHOR

...view details