महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या नेरपिंगळाईच्या गंगाधर स्वामी मठातील बाप्पाला भावपूर्ण निरोप - amarawati ganesh festival

लोककलेचा व धार्मिकतेचा वारसा लाभलेल्या नेरपिंगळाई गावातील गंगाधर स्वामी मठाच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बाप्पाला गुरूवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला.

अमरावतीच्या नेरपिंगळाईच्या गंगाधर स्वामी मठातील बाप्पाला भावपूर्ण निरोप

By

Published : Sep 12, 2019, 8:29 PM IST

अमरावती - लोककलेचा व धार्मिकतेचा वारसा लाभलेल्या नेरपिंगळाई गावातील गंगाधर स्वामी मठाच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बाप्पाला गुरूवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली होती.

अमरावतीच्या नेरपिंगळाईच्या गंगाधर स्वामी मठातील बाप्पाला भावपूर्ण निरोप

हेही वाचा - सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह असताना लातुरात मात्र गणेश संकलन

अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावातील गंगाधर स्वामी यांच्या मठात शेकडो वर्षांपासुन गणेश स्थापनेची परंपरा आहे. विदर्भातील मानाचा गणपती म्हणुन आख्यायिका असलेल्या या गणपतीच्या स्थापनेनंतरच गावातील घरगुती व मंडळातील गणपतीची स्थापना होते. दरम्यान, गुरूवारी अनंत चतुर्थीला सर्वात आगोदर गंगाधर स्वामी यांच्या मठातील गणपतीचे विसर्जन झाले. गणपतीची मिरवणूक ही पारंपरीक पद्धतीने पालखीत बसवून व खाद्यांवर घेऊन संपूर्ण गावातून काढली घेली. आपल्या लाडक्या बाप्पाच अखरेचे रूप व भावपूर्ण निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा - पुण्याच्या पाचही मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

हेही वाचा - गणेश विसर्जन : पवई तलावात घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details