अमरावती -समाजातील विधवा, परित्यक्ता, व्यसनी पती असलेल्या, वंचित आणि दुर्बल घटकातील महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाच्या संगोपनाची जबाबदारी सबळतेने पार पाडावी. आशा महिलांना समाजासमोर किंवा कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहायची गरज पडू नये या एकमात्र हेतूने ताराबाई पाध्ये यांनी सन १९५० मध्ये गरीब व गरजू स्त्रियांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा विडा त्यांनी उचलला. त्यांच्या त्या आधारवड बनल्या आणि यातूनच शारदा उद्योग मंदिराचा पाया रचला ( Glorious History of Sarada Udyog Temple ) गेला.
कोण होत्या ताराबाई पाध्ये? - 'वऱ्हाडचे नवाब' अनभिषिक्त राजे ,रसिक आणि वकील अशी ओळख असलेले दादासाहेब खापर्डे हे टिळकांचे समकालीन व राजकीय चळवळीतील सहकारी होते. मराठी इंग्रजी, उर्दू, हिंदी, संस्कृत आणि गुजराती भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ताराबाई पाध्ये ह्या दादासाहेब खापर्डे यांची नात आणि बाबासाहेब खापर्डे यांची मुलगी. सी.पी.अँड बेरार मध्यप्रांत मंत्रिमंडळात बाबासाहेब खापर्डे हे मंत्री होते. त्यामुळे राजकारणाचे व समाजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं होतं. पण त्यांचा ओढा राजकारणापेक्षा समाजकारणाकडेच अधिक होता.
अशी रोवल्या गेली शारदा उद्योगाची मुहूर्तमेढ -त्याकाळी महिलांमध्ये शिक्षणाचा फारसा प्रसाद झालेला नव्हता पण महिलांमध्ये असलेला पाककला हा गुण फिरून त्याच आधारे त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न ताराबाईंनी बघितले आणि शारदा उद्योग मंदिराची मुहूर्तमेढ रोवली गेली. सन १९५५ मध्ये ताराबाई पाध्ये यांनी समविचारी ६ महिलांना आपल्या सोबत घेऊन त्यांच्याकडून आजीवन सदस्यत्वाची ५१ रुपये फी घेऊन ही संस्था सुरू केली. अवघ्या ३५७ रुपयांच्या भांडवलात सुरू केलेल्या या संस्थेची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपये एवढी आहे.
पेपर मिंटच्या गोळ्या पासुन उत्पादनाची सुरुवात -अगदी सुरुवातीच्या काळात शिवणकाम व पेपरमिंटच्या च्या गोळ्या बनविणे या कामाचे प्रशिक्षण देऊन उत्पादन करणे व त्याची विक्री करणे अशा कामापासून सुरुवात झाली ( Varieties of products of Sarada Udyog Mandir ) होती. पापडाचे सर्व प्रकार लोणचे कैरीची गोड पदार्थ विविध प्रकारचे मसाले विविध चटण्या विविध धान्यांचे तयार पीठ चविष्ट गोड पदार्थ खारी पदार्थ रुखवताचे पदार्थ व इतर वस्तू या ठिकाणी तयार होतात.
उत्पादने जातात सातासमुद्रा पार -शारदा उद्योग मंदिरात तयार झालेले विविध प्रकारचे उत्पादने खास करून खारे शंकरपाळे, साधी शेव ,मसाला शेव, चकली चिवडा, तळलेला पोह्यांचा चिवडा,करंज्या, अनारसे, बेसन लाडू, रवा बेसन लाडू, दाणे लाडू, तीळ लाडू , तिळाच्या वड्या, चिरोटे, शंकरपाळे, ओल्या नारळाची करंजी या चविष्ट पदार्थांना अमेरिका जर्मनी इंग्लंड यासह अन्य राष्ट्रांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे संस्थेच्या अध्यक्ष स्वाती पाध्ये यांनी ( Selling product in country and abroad ) सांगितले. उद्योग क्षेत्रात मोठी उलाढाल ( Big turnover in industry )आहे.
शहराच्या मध्यवस्तीत डौलदार इमारत -सुरुवातीला खापर्डे वाड्यातच उत्पादन व विक्रीचा हा उद्योग सुरू करण्याचा आला होता. अमरावतीचे तत्कालीन नगराध्यक्ष वीर वामनराव जोशी यांच्या सहकार्यामुळे १९५२ मध्ये संस्थेला शहराच्या मध्यवस्तीत जवळपास ३५०० स्वकेअर फुटाची जागा लिजवर मिळाली होती. २००५ मध्ये संस्थेने ही जागा शासनाकडून विकत घेतली. आज संस्थेची शहराच्या मध्यवस्तीत डौलदार इमारत आहे.