अमरावती - स्वसंरक्षणासाठी बळकट होऊन अमरावतीत स्वयंसिद्धा सज्ज होत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व शाळेच्या विद्यार्थिनींना स्वसंक्षणाचे धडे दिले जात आहेत. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे कराटे प्रशिक्षण घेऊन युवती आता संकटांशी निर्भीडपणे मुकाबला करण्यासाठी तयार होत आहेत.
अमरावतीत जिल्ह्यातील प्रत्येक मुलगी होणार 'स्वयंसिद्धा'
स्वसंरक्षणासाठी बळकट होऊन अमरावतीत स्वयंसिद्धा सज्ज होत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व शाळेच्या विद्यार्थिनींना स्वसंक्षणाचे धडे दिले जात आहेत.
अमरावती शहरात मुलींची छेड काढणे असे प्रकार गत काही दिवसांपासून वाढले आहे. काही दिवसांपूर्वी अर्पिता ठाकरे या युवतीची भर रस्त्यात हत्त्या झाल्याने अमरावती शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 80 हजार युवतींना कराटे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसिद्धा बनवण्यात येत आहे.
जिल्ह्याल विविध शाळांमध्ये आणि शहरात श्री हनुमान व्यायाम शाळेत 29 जुलै ते 2 ऑगस्ट या कालवधीत 2250 मुलींना कराटे, लाठीकाठी, एरोबिक्स आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देण्यात आले. यापुढे प्रत्येक शाळेतील सर्व मुलींना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर, 15 ऑगस्टला जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्ह्यातील स्वयंसिद्धा प्रात्यक्षिक सादर करणार असल्याची महिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.