अमरावती- तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वऱ्हा येथे एका 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. निलिमा उर्फ रिद्धी श्रीकृष्ण मदनकर असे मृत तरूणीचे नाव आहे.
अमरावतीमध्ये गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या हेही वाचा - अतीवृष्टीमुळे अमरावतीत सोयाबीनचे पीक सडण्याच्या मार्गावर
याबाबत अधिक माहिती अशी की, रिद्धी 12 वी मध्ये शिक्षण घेत होती. तिने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. रिद्धीची आई स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करत असतानाच मागच्या खोलीत ही घटना घडली. रिद्धीने गळफास घेतला त्या ठिकाणी तिचे पाय जमिनीला टेकल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी संशय व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांना गावातील एका मुलाबरोबर तिचे प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती मिळाली. रिद्धीचा मृतदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र, पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटल्यामुळे तिवसा ग्रामीण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. तिचे शवविच्छेदन अमरावती रूग्णालयात करण्यात येणार आहे.
हेही वाचा -अमरावतीमध्ये अंबादेवीच्या अभिषेकाने नवरात्रोत्सवाला प्रारंभ...
घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी तूर्तास मृत्यूची नोंद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन जाधव करत आहेत.