अमरावती - शहरातील चुनाभट्टी परिसरात तरुणाने एका विद्यार्थीनीवर चाकूने हल्ला केला. यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थिनीची तरुणाकडून गळा चिरून हत्या, अमरावतीमधील घटना - चुनाभट्टी परिसर
पीडितेने अखेरचा श्वास घेताच नातेवाईकांना रुग्णालयात आक्रोश केला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पीडित तरुणी शहरातील भारतीय महाविद्यालयात बी. कॉम. प्रथम वर्षाला शिकत होती. ती आज दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास शिकवणी वर्गातून मैत्रिणीसोबत घराकडे जायला निघाली होती. त्यावेळी तुषार किरण मस्करे (वय २१) या तरुणाने वेष बदलून तरुणीवर चाकूने हल्ला करून तिचा गळा चिरला. यामध्ये तिची मैत्रिण देखील जखमी झाली आहे. परिसरातील नागरिकांनी तिचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान परिसरातील नागरिकांनी हल्लेखोर तरुणाला पकडून चोप दिला. तसेच त्याला राजपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अधिक तपास राजपेठ पोलीस करीत आहेत.