अमरावती - प्रेमप्रकरणातून प्रियकरासह त्याचे नातेवाईक सतत त्रास देत असल्यामुळे एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सार्शी गावात ही घटना घडली. या प्रकरणी माहुली (जहांगीर) पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या चार नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या; प्रियकरासह चार जणांवर गुन्हा दाखल - tivsa
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सार्शी गावात ही घटना घडली. या प्रकरणी माहुली (जहांगीर) पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या चार नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Girl committed suicide in amravati due to love matter boyfriend and four others arrested
आकांशा सुधीर तेलमोरे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आकांशा आणि विवेक नरेंद्र वानखडे यांचे मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यातूनच विवेक आणि त्याचे नातेवाईक आकांशाला नेहमी त्रास देत. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी पोलिसांनी विवेक नरेंद्र वानखडे, विक्की नरेंद्र वानखडे, नरेंद्र नानाजी वानखडे यांसह कुटुंबातील दोन महिला अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.