महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravati crime news: पाहुणे म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीला दारू पाजून सामूहिक अत्याचार - कसबा पोलीस

गावात पाहुणे म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीला चक्क दारूपासून तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार दोन महिलांच्या मध्यस्थीने घडला.

Amravati crime news
सामूहिक अत्याचार

By

Published : Mar 14, 2023, 12:59 PM IST

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील दूरच्या नात्यातील आजीकडे 17 वर्षीय युवती पाहुणी म्हणून आली होती. 6 मार्च रोजी दुपारच्या सुमारास मुलीच्या आजीचे घर असणाऱ्या परिसरात राहणाऱ्या दोन महिला मुलगी घरी एकटी असताना तिच्या जवळ आल्या. या दोन महिलांनी मुलीला दारू पाजली. दारू पिल्याने बेशुद्ध झालेल्या मुलीला त्या दोन महिलांनी अनिल आणि विकी या दोन तरुणांना घरात बोलवून त्या दोघी घराचे दार बाहेरून बंद करून निघून गेल्या. दारूच्या नशेत बेशुद्ध असणाऱ्या त्या तरुणीवर अनिल आणि विकी ह्या दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.

जीवे मारण्याची दिली होती धमकी:या घटनेनंतर त्या युतीला झाल्या प्रकाराची कुठे वाच्यता केली तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरामुळे युवती प्रचंड घाबरली होती. दरम्यान सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर ही युवती शनिवारी तिच्या बहिणीच्या घरी गेल्यावर तिने झाला प्रकार बहिणीला सांगितला. बहिणीने तिला धीर दिल्यावर रविवारी तिने शिरजगाव कसबा पोलीस ठाणे गाठले आणि झाल्याप्रकाराबाबत तक्रार दिली. सहा दिवसानंतर हा संताप जनक प्रकार उघड झाल्यावर शिरसगाव कसबा पोलीसांनी या प्रकरणात 35 आणि 55 वर्षाच्या दोन महिलांसह अनिल आणि विकास या दोन युवकांना अटक केली.


पोलीस करीत आहेत चौकशी: अटक करण्यात आलेल्या चौघांनाही पोलीसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही महिलांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तर अनिल आणि विकास या आरोपी युवकांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असणाऱ्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात तक्रार येताच तात्काळ कारवाई केली असल्याची महिती शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत गीते यांनी दिली. समाजात गुन्हे हे वाढत आहेत. त्यामुळे मुलीच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: Kushinagar Crime कुशीनगरमध्ये 4 वर्षांच्या मुलीवर शेजाऱ्याने केला बलात्कार महिन्यात दोनदा केले वासनेचा शिकार

ABOUT THE AUTHOR

...view details