अमरावती- अंजनगाव तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना काल (६ सप्टेंबर) उघडकीस आली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध गन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडिता ही घरी असताना आरोपी तिच्या घरात घुसले व तिचा विनयभंग केला. त्यानंतर काही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.