अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील गायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील ई क्लास जमिनीवर येथे गेल्या आठ दिवसांपासून पारधी समाजातील ७८ कुटुंबांनी मध्यरात्रीच अतिक्रमण केले. या विरोधात आता गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून आज त्यांनी 'बेसन भाकर करो' हे आंदोलन केले.
गणेशपूर ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर 'भाकर बेसन करो' आंदोलन - भाकर बेसन करो
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील गायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील ई-क्लास जमिनीवर येथे गेल्या आठ दिवसांपासून पारधी समाजातील ७८ कुटुंबांनी मध्यरात्रीच अतिक्रमण केले. या विरोधात आता गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून आज त्यांनी 'बेसन भाकर करो' हे आंदोलन केले.
![गणेशपूर ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर 'भाकर बेसन करो' आंदोलन Ganeshpur villagers Bhakar Besan Karo agitation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10953067-576-10953067-1615384585364.jpg)
हे ही वाचा - सरकारने दिलेल्या जमिनीवर रामदेव बाबासह अंबानी कधी उद्योग उभे करणार?
त्यामुळे गणेशपूर ग्रामस्थांनी आता गेल्या पाच दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर महिलांसह ठिय्या आंदोलन उभारलेले आहे. आज बेसन भाकर आंदोलन करत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. जोपर्यंत पारधी समाजातील लोकांनी ई क्लास जमिनीवर केलेले अतिक्रमण हटवणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील, असे सुद्धा ठाम मत गणेशपूर ग्रामस्थांनी मांडले आहे. ई क्लास जमिनीवर पारधी समाजातील लोकांनी अतिक्रमण केले असून ते अतिक्रमण काढण्यास शासनाला कुठला दबाव येत आहे, की राजकीय पोटी शासन कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे का, असा आरोपही गणेशपूर वाशी यांनी केला आहे.