महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gandhari Invited Sing Song : शंकर बाबांच्या आश्रमातील गांधारीला अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण, वन इंडिया अवॉर्ड 2022 मध्ये गाणार गीत - शंकर बाबा आश्रम

अमरावतीच्या वझ्झर येथील शंकर बाबा पापडकर यांच्या आश्रमातील (Shankar Baba Papadkars ashram) गांधारीला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी 'वन इंडिया अवॉर्ड 2022' या सोहळ्यात (One India Award 2022), स्वागत गीत म्हणण्यासाठी आमंत्रित (Gandhari was invited to sing welcome song) केले आहे. 15 डिसेंबर रोजी हा सोहळा मुंबईच्या दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह येथे होणार आहे.

Gandhari Invited Sing Song
गांधारीला अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण

By

Published : Dec 13, 2022, 6:01 PM IST

अमरावती :अनाथांचे नाथ अशी ओळख असणाऱ्या शंकर बाबा पापडकर (Shankar Baba Papadkars ashram) यांच्या वझ्झर येथील आश्रमातील, अंध असणाऱ्या मानसकन्या गांधारीला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी 'वन इंडिया अवॉर्ड 2022' या सोहळ्यात (One India Award 2022) स्वागत गीत म्हणण्यासाठी आमंत्रित (Gandhari was invited to sing welcome song) केले आहे.


गांधारीच्या माध्यमातून जिल्ह्याला बहुमान : 'माय होम इंडिया' या संस्थेच्या वतीने दरवर्षी 'वन इंडिया अवॉर्ड' हा सोहळा आंध्र प्रदेशात आयोजित करण्यात येतो. वन इंडिया अवार्ड हा ईशान्य भारतातील एका व्यक्तीला दिला जातो. यंदा अरुणाचल प्रदेशातील न्यिशी जमातीच्या श्रद्धा पुनर्जागरण चळवळीतील प्रमुख कार्यकर्ता तेजी गुरुजी यांना अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या हस्ते बहाल केला जाणार आहे. 15 डिसेंबर रोजी हा सोहळा मुंबईच्या दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह येथे होत आहे. या कार्यक्रमाचे स्वागत गीत गाण्याचा बहुमान गांधारीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याला मिळाला आहे. भाजपचे महासचिव सुनील देवधर यांच्या माध्यमातून अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी गांधारीला निमंत्रण पाठविले आहे.


गांधारी म्युझिक थेरपी द्वारे रुग्णांना देते आनंद :वझ्झर येथे शंकर बाबा पापडकर यांचे स्वर्गीय अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात वाढलेली गांधारी ही अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या कार्यरत आहे. ती रुग्णालयात म्युझिक थेरपीच्या माध्यमातून रुग्णांना आनंद देते. 25 वर्षांपूर्वी पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठावर सापडलेल्या गांधारीला आजीवन पुनर्वचनाकरिता न्यायालयाच्या आदेशाद्वारे वझ्झर येथील शंकर बाबा पापडकर यांना स्वाधीन करण्यात आले होते.

गांधारी आहे संगीत विशारद : शंकर बाबा पापडकर यांनी गांधारीच्या आई वडिलांची भूमिका बजावत तिला योग्य शिक्षण दिले. अमरावतीच्या अंध विद्यालयात शिक्षण घेत ती बारावी उत्तीर्ण झाल्यावर अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई येथील संगीताच्या सात विशारद परीक्षा ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details