अमरावती- संत गाडगेबाबा यांच्या संदेशाचे पालन करत भुकेलेल्यांना नियमितपणे भोजन मिळावे यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी चांदुरबाजार येथे शनिवारी 'गाडगेबाबा रोटी अभियान' सुरू केले आहे. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून भुकेलेल्यांना रोज अन्न मिळणार आहे.
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व प्रहार संघटना यांच्या संकल्पनेतुन हे अभियान सुरू करण्यात आले आहे. वृद्ध, अनाथ, अपंग यांच्यासाठी चांदुरबाजार येथे गाडगेबाबा रोटी अभियानाचा शनिवारी मोठ्या प्रमाणावर शुभारंभ करण्यात आला.