महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : मित्रानेच केली मित्राची हत्या; धामणगाव रेल्वे तालुक्यातील घटना - मित्रानेच केली मित्राची हत्या धामणगाव रेल्वे

पोलीस सूत्रांनुसार, रामभाऊ भीमराव काकडे (४५) असे मृताचे, तर स्वप्निल रमेश मून (३२) हे आरोपीचे नाव आहे. दोघेही रविवारच्या रात्री १२.३० वाजता दारू पिऊन सावळा गावाच्या चौकात गप्पा मारत असताना एकमेकांत वाद झाला.

friend murdered by his friend in amravati
मित्रानेच केली मित्राची हत्या

By

Published : May 24, 2021, 8:56 PM IST

अमरावती -दोन्ही मित्र दारू पिऊन गप्पा मारत असताना वाद झाला आणि एकाने काठीने मारहाण केल्याने दुसऱ्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी बारा तासांच्या आत सदर आरोपीला अटक केली. ही घटना जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येणाऱ्या दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळा गावात घडली.

हत्या करून आरोपीने काढला पळ -

पोलीस सूत्रांनुसार, रामभाऊ भीमराव काकडे (४५) असे मृताचे, तर स्वप्निल रमेश मून (३२) हे आरोपीचे नाव आहे. दोघेही रविवारच्या रात्री १२.३० वाजता दारू पिऊन सावळा गावाच्या चौकात गप्पा मारत असताना एकमेकांत वाद झाला. आरोपी स्वप्निलने रामभाऊच्या डोक्यावर काठी मारली. त्यात तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूरचे ठाणेदार ब्रह्मानंद शेळके आणि रात्रीला घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध घेतला. मात्र, आरोपी मिळाला नाही.

हेही वाचा -अमरावतीत मुख्य स्मशानभूमीव्यतिरिक्त इतर स्मशानभूमी विकसित करण्याची मागणी

सोनेगाव खर्डा येथे सापडला आरोपी -

दरम्यान, तीन पोलीस पथके रात्रीच वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली. सोनेगाव खर्डा परिसरातील एका शेतात आरोपी स्वप्निल आढळला. पोलीस पथकाने लगेच त्याला ताब्यात घेतले. चांदूर रेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी रविवारी रात्री घटनास्थळाला भेट दिली. या घटनेचा अधिक तपास दत्तापूरचे ठाणेदार ब्रम्हानंद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार शिवशंकर खेडकर करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details