महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीतही पेटली होती देशाच्या स्वातंत्र्याची मशाल

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावात १९३० साली भारताच्या स्वातंत्र्याची लढाई पेटली होती. त्यानंतर १८ ऑगस्ट १९४२ ला ब्रिटिशांसोबत झालेल्या रक्तरंजित क्रांतीत या गावातील ६ लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.

यावली शहीद गाव

By

Published : Aug 15, 2019, 1:20 PM IST

Updated : Aug 15, 2019, 9:53 PM IST

अमरावती -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा देशाच्या स्वतंत्र लढ्यात सिंहाचा वाटा आहे. त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावात १९३० साली भारताच्या स्वातंत्र्याची लढाई पेटली होती. त्यानंतर १८ ऑगस्ट १९४२ ला ब्रिटिशांसोबत झालेल्या रक्तरंजित क्रांतीत या गावातील ६ लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीतही पेटली होती देशाच्या स्वातंत्र्यची मशाल

महात्मा गांधी यांनी ८ ऑगस्ट १९४२ ला ब्रिटिशांना चले जावचा इशारा दिला होता. त्यानंतर १६ तारखेला चिमूर, आष्टी आणि बेनोडा गावात मोठे आंदोलन झाले होते. तेथील लोकांनी ब्रिटिशांचा ध्वज उतरवून तिरंगा फडवकला होता. या तीन गावात झालेल्या क्रांतीत अनेक जण हुतात्मा झाले होते. त्यानंतर २ दिवसांनी या आंदोलनाची ठिणगी यावली गावात पडली. १८ ऑगस्टचा दिवस उजाडला तेव्हा शेकडो ब्रिटिश यावली गावात आले. यावेळी पंजाबराव यावलीकर यांच्या नेतृत्वाखाली या गावात ब्रिटिशांविरोधात लढा सुरू झाला. या लढ्यात लढ्यात ६ स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले होते. तर अनेकांनी गोळ्या झेलल्या होत्या. यात गोमाजी राऊत यांनीही ब्रिटिशांचा सामना केला होता.

सध्या यावली गावात सुमारे ७० स्वातंत्र सैनिक आहेत. याच गावातील जोशीरामजी वासनकर यांनीही ब्रिटिशांच्या गोळ्यांशी सामना केला होता. त्यानंतर त्यांना शिक्षा म्हणून ४ वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले होते. आजही त्यांच्या आठवणी त्यांच्या पत्नी द्रौपदा बाई वासनकर सांगतात. याच गावातील तुळशीरामजी अंबाडकर हे सुद्धा स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. आपल्या वडिलांनी देशासाठी ब्रिटिशांच्या गोळ्या झेलल्या. मात्र, आपल्या कुटुंबाला शासनाकडून शासकीय योजनेचा फायदा होत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.

Last Updated : Aug 15, 2019, 9:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details