महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीकविमा सर्वेक्षणात घोळ; तलाठी, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी - पीक विमा सर्वेक्षण घोळ अंजनगाव सुर्जी

अंजनगांव सूर्जी तालुक्यातील गावंडगाव हिंगणी या भागात जवळपास ९० टक्के मूग, उडदाची शेती केली जाते. यावर्षी झालेल्या संततधार पावसाने काढणीस आलेले हे मूग ऊडीदाचे पीक खराब झाले होते. खराब झालेल्या पिकाचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी २६ सप्टेंबरला शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना केली होती.

fraud in crop insurance survey, farmers demanded action on talathi gramsevak in amravati
पीकविमा सर्वेक्षणात घोळ; तलाठी, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

By

Published : Feb 7, 2020, 7:54 AM IST

अमरावती - गेल्यावर्षी झालेल्या अती पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मूग, उडीद, सोयाबीनचे पीक पूर्णतः नष्ट झाले. या पिकांचा पीकविमासुद्धा उतरवण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. म्हणून ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावंडगाव हिंगणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच शासनाने फेर सर्व्हे करावा आणि पीक विमा शेतकऱ्यांना तत्काळ द्यावा, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे. यासंबंधिचे निवेदनही त्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे.

पीकविमा सर्वेक्षणात घोळ; तलाठी, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

अंजनगांव सूर्जी तालुक्यातील गावंडगाव हिंगणी या भागात जवळपास ९० टक्के मूग, उडदाची शेती केली जाते. यावर्षी झालेल्या संततधार पावसाने काढणीस आलेले हे मूग ऊडीदाचे पीक खराब झाले होते. खराब झालेल्या पिकाचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी २६ सप्टेंबरला शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना केली होती.

हेही वाचा -ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल

यानंतर संबंधित तलाठी, ग्रामसेवक यांनी पंचनामेसुध्दा केले. मात्र, पंचनामे करताना सातेगाव आणि भंडारज महसूल मंडळाचे पंचनामे एकत्र करुन पिकतक्ता अहवाल केला. या अहवालात ज्या शेतकऱ्यांनी मूग पेरला नाही, त्यांचे नाव या यादीत आले. तसेच ज्या भागात या पिकांचे नुकसान झाले त्या ठिकाणी नुकसान झालेच नाही, असे दाखवण्यात आले. यामुळे गावंडगाव आणि हिंगणी येथील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

यासाठी संबधित तलाठी आणि ग्रामसेवक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि शेताचा फेर सर्व्हे करण्यात यावा अशी मागणी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी संदिप लहाने, सूहास हरणे, निलेश देशमुख, शाम देशमुख, शिरिष हरणे, भानुदास हरणे, गणेश बोरकर, आदी. शेतकरी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details