अमरावती- सकाळी अंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर गरम पाण्याचा नळ तुटून पडल्याने चार विद्यार्थी भाजल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथील मुकुंदराव पवार मिलिटरी स्कूलमध्ये घडली आहे. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असून त्याला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर तीन विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अमरावती : गरम पाण्याचा नळ तुटल्याने चार विद्यार्थी भाजले, एकाची प्रकृती चिंताजनक - धामणगाव रेल्वे
सकाळी अंघोळ करताना गरम पाण्याचे नळ तुटल्याने चार विद्यार्थी भाजले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
धामणगाव ग्रामीण रुग्णालय
धामणगाव रेल्वे शहरानजिक जुना धामणगाव येथे मुकुंदराव पवार शैक्षणिक संकुल आहे. याच संकुलात मिलिटरी स्कूल आहे. आज सकाळी हे विद्यार्थी अंघोळीसाठी गेले होते. गरम पाणी येणारा नळ हा अचानक तुटला आणि ही दुर्घटना घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा -11 महिन्याच्या बाळाला विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न, बाळाचा मृत्यू