महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणी चार जणांना पोलीस कोठडी; दोघे फरार

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणातील चार आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून दोघे जण अद्याप फरार आहे. तर एकाला कोरोना संसर्ग झाल्याने आरोपीवर उपचार सुरू आहे.

amravati Remedesivir black market case
अमरावती : रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणी चार जणांना पोलस कोठडी

By

Published : May 25, 2021, 9:42 PM IST

अमरावती -रेमडीसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून डॉ. पवन मालुसुरे व अन्य एक पसार आहेत. उर्वरित एक आरोपी करोनाग्रस्त असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

रिपोर्ट

चौघांना पोलीस कोठडी -

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात आरोपी डॉ. अक्षय मधुकर राठोड (24), अनिल विनीत फुटाणे, शुभम शंकर किल्लेकर (24) व शुभम कुमोद सोनटक्के (24) या चार जणांना पोलीस कोठडी न्यायदंडाधिकार्‍यांनी नाकारली होती. त्यामुळे सरकारी पक्षातर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात पूर्नविचार याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने चारही आरोपींना 27 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, डॉ. पवन मालुसुरे व आरोपी परिचारीका सध्या पसार आहेत. मालुसुरे यांची जमानत यापूर्वीच खारीज करण्यात आली होती. याशिवाय अनिल गजानन पिंजरकर (38) याला कोरोनाची लागण असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

आरोपींना ताब्यात घेतले -

रेमडेसिवीर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून डॉ. पवन मालुसुरे व परिचारिका युवती सध्या फरार आहेत. दोघेही न्यायालयापुढे हजर झाल्यानंतर त्याच्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

हेही वाचा - कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन

ABOUT THE AUTHOR

...view details