महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत गणेश विसर्जनावेळी 4 तरुण नदीत बुडाले; शोध सुरू

गावातील सार्वजनिक गणपती विसर्जनादरम्यान चार तरुण गणेश मूर्तीसोबत नदी पात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदान न आल्याने ते नदीत बुडाल्याची माहिती आहे.

अमरावतीत बुडालेले चार तरूण

By

Published : Sep 12, 2019, 9:02 PM IST

Updated : Sep 12, 2019, 10:12 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे गणेश विसर्जनादरम्यान नदी पात्रात चार तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरुवारी) सायंकाळी घडली असून घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे. दरम्यान, बुडालेल्या तरुणांचा अजूनही शोध लागलेला नाही.

गावातील सार्वजनिक गणपती विसर्जनादरम्यान चार तरुण गणेश मूर्तीसोबत नदी पात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदान न आल्याने ते नदीत बुडाल्याची माहिती आहे. दरम्यान, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून तरुणांचा शोध सुरू आहे. सतीश अजाबराव सोळंके (वय २८), ऋषिकेश बाबुराव वानखडे (वय २२), संतोष बारीकराव वानखडे (वय ४५), सागर अरुण शेंदुरकर (वय २०) राहणार गौरखेडा असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

हेही वाचा -नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणूक उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात खासदार हिना गावितांनीही केले नृत्य

Last Updated : Sep 12, 2019, 10:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details