अमरावती- गावाशेजारील नाल्यात मानवी सांगाड्याचे अवशेष आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना अमरावती जिल्ह्यातील कापूसतळणी गावाजवळील नाल्यात उघडकीस आली. यात मानवी हाडांसह कपड्यांचाही समावेश आहे.
धक्कादायक; कापूसतळणी गावाजवळील नाल्यात सापडला मानवी शरीराचा सांगाडा - अमरावती
गावाशेजारील नाल्यात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा सांगाडा महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
सापडलेला सांगाडा
कापूस तळणी गावाजळ असलेल्या सटवाई नाल्याजवळ एक मानवी सांगाडा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हा सांगाडा वृद्ध महिलेचा असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. या सांगाड्याजवळ कवटी, हाडं, लुगडं, ब्लाउज, आदी वस्त्र सापडले आहेत. माहुली पोलिसांनी सांगाडा जप्त करून तो अकोला येथील शरीर रचना विभागाकडे तपासणीसाठी पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.