अमरावती - महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र, अमरावती विभागातील मोजक्याच शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, तर अनेकांची कर्जमाफी झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भात सावळा गोंधळ झाला आहे, असा आरोप माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शासनावर केला आहे.
शेतकरी कर्जमाफीत सावळा गोंधळ झालाय, माजी कृषीमंत्री अनिल बोंडेंचा निशाणा - महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. मात्र यात सावळागोंधळ झाला असल्याचा आरोप माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केले.
माजी कृषी मंत्री अनिल बोंडे
हेही वाचा -'...आत्महत्या करण्याची वेळ आलीय आमच्यावर'