महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिकारीच्या बेतातील बिबट्या कुत्र्यासह पडला विहिरीत; वन विभागाच्या बचाव पथकाने दिले जीवनदान

कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात एक बिबट्या कुत्र्यासह विहिरीत पडला. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा सोडून त्याची सुखरूप सुटका केली आहे.

शिकारीच्या बेतातील बिबट्या कुत्र्यासह पडला विहिरीत;
शिकारीच्या बेतातील बिबट्या कुत्र्यासह पडला विहिरीत;

By

Published : Aug 14, 2021, 12:35 PM IST

Updated : Aug 14, 2021, 12:55 PM IST

अमरावती- कुत्र्यांची शिकार करण्यासाठी पाठलाग करणारा बिबट्या कुत्र्यासह विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. येथील कोंडेश्वर परिसरातील राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातल्या विहिरीत पडलेला बिबट्या आणि कुत्रा शनिवारी सकाळी आढळून आला.त्यानंतर ग्रामस्थांनी या घनटेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी या दोन्ही प्राण्याची विहिरीच्या पाण्यातून सुटका केली आहे.

वन विभागाचे बचाव पथक दाखल

विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळताच वनविभाचे बचाव पथक तायडे यांच्या शेतात पोहोचले. बचाव पथकाचे प्रमुख वनरक्षक अमोल गावनेर, वन मजूर सतीश उमक, मनोज ठाकूर, रोजंदारी मजूर वैभव राऊत, आसिफ पठाण यांनी विहिरीतील बिबट बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी वडाळी वन परिक्षेत्र अधिकारी कैलास भुम्बर हे सुद्धा तायडे यांच्या शेतशिवरात पोहोचले.

शिकारीच्या बेतातील बिबट्या कुत्र्यासह पडला विहिरीत;
विहिरीत सोडला पिंजराबिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी विहिरीत लोखंडी पिंजरा सोडण्यात आला. यावेळी बघ्यांची गर्दी उसळ्याने बचाव पथकाच्या कामात प्रचंड अडथळा येत होता. पिंजरा विहिरीत सोडताच क्षणातच बिबट्याने पिंजऱ्यात धाव घेतली. बचाव पथकाने पिंजऱ्याचे दार बंद केल्यावर हा पिंजरा दोराच्या साह्याने बाहेर खेचण्यात आला. त्यानंतर तो पिंजरा ट्रॅक्टरच्या ट्रॉलित टाकून वडाळी वन परिक्षेत कार्यालय परिसरात नेण्यात आला आहे. बिबट्याला काढल्यानंतर कुत्र्यालाही बाहेर काढण्यात आले.आरोग्य तपासणी करून सोडणारविहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या बिबट्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वडाळी वन परिक्षेत्र अधिकारी कैलास भुम्बर यांनी दिली. आरोग्य तपासणी केल्यावर बिबट्याला सुरक्षित स्थळी जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती कैलास भुम्बर यांनी दिली.

बिबट्या पाहण्यासाठी विहिरीवर गाव-

कोंडेश्वर आणि बडनेरा परिसराच्या लागत असणाऱ्या मनोहर तायडे यांच्या शेतात बिबट पडल्याची माहिती गावात पसरली. त्यानंतर सर्वत्र पसरताच बडनेरा परिसरातील शेकडो नागरिकांची गर्दी बिबट पाहण्यासाठी उसळली. दरम्यान बडनेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न केला.

Last Updated : Aug 14, 2021, 12:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details