अमरावती -अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज (सोमवार) ५३वा पुण्यतिथी महोत्सव होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महानिर्वाण 11 ऑक्टोबर 1968 रोजी 5 वाजताच्या दरम्यान गुरुकुंज मोझरीत झाले होते. मागील 53 वर्षेपासून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील उपस्थित लावली.
- शहिद जवानांना, कोरोनात जीव गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली -
तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे विचार आणि कार्याने प्रेरित झालेले देशभरातील अनुयायी हे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये त्यांच्या महासमाधी स्थळी उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी संत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली वाहिली. तसेच देशासाठी शहिद झालेल्या जवानांना व कोरोना काळात जीव गमावणाऱ्या कोरोना योद्धांना देखील या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
- तुकडोजी महाराजांनी गायलेली भजनाचा कार्यक्रम -