महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुरामुळे जिल्ह्यातील 'या' गावाचा मागील २४ तासांपासून तुटला संपर्क...वाचा सविस्तर - तिवस्यातील नमस्कारी गाव

मागील ३ दिवसांपासून जिल्ह्यासह मध्यप्रदेशात जोरादार पाऊस सुरू आहे. यामुळे अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग करण्यात येतोय. यातच जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.

नमस्कारी गाव
नमस्कारी गाव

By

Published : Aug 30, 2020, 2:02 PM IST

अमरावती - जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस शनिवारी दूपारपर्यंत कायम राहिल्याने सर्वच धरणांचा जलसाठा वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणासह सहा धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तिवसा तालुक्यातल्या कौंडण्यपूर जवळून वाहणार्‍या वर्धा नदीला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पुर आल्याने अमरावती-वर्ध्याला जोडणार पूल पाण्याखाली गेला होता. तसेच तिवसा तालुक्यातील नमस्कारी या गावाला जोडणाऱ्या पुलावरून अद्यापही पाणी वाहत असल्याने मागील २४ तासांपासून गावाचा संपर्क तुटला आहे.

तिवस्यातील नमस्कारी गाव
मागील तीन दिवसापासून जिल्ह्यासह मध्यप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे १३ ही दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले होते. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला होता. यामुळे नदीकाठावरील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तिवसा तालुक्यातील नमस्कारी या गावाला जोडणाऱ्या पुलावरून देखील पाणी वाहत असल्याने या गावाचा मार्ग बंद झाला. आज अप्पर वर्धा धरणाचे ५ दरवाजे बंद केले असून ९ दरवाजे ४४ सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीचा पूर ओसरला असला तरी मागील २४ तासापासून तिवसा तालुक्यातील नमस्कारी गावाचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या वतीने उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदरांंनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details