महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोर्शी पूर : घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत - अमरावती पूर

पुराची माहिती मिळताच तत्परता दाखवत पालकमंत्री अनिल बोंडेंनी मदतीची घोषणा केली. मात्र, राहण्याचे तर सोडाच पण खाण्यासाठी अन्नाचीही सोय झाली नसल्याची खंत पूरग्रस्तांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

अमरावतीमध्ये पूर

By

Published : Sep 7, 2019, 7:45 PM IST

Updated : Sep 7, 2019, 8:33 PM IST

अमरावती- जिल्ह्यातील मोर्शी परिसर आणि सातपुडा पर्वत रांगेमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोर्शी शहराजवळून वाहणाऱ्या नळ आणि दमयंती या नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी शहरात शिरले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शाळा आणि घरात पाणी शिरल्यामुळे जीवनोपयोगी साहित्याची नासाडी झाली आहे.

मोर्शीत मुसळधार पावसामुळे पूर

हेही वाचा -मोर्शीतील पुरातून सुरक्षित स्थळी हलवलेल्या गणरायाची पुन्हा स्थापना, व्हिडिओ व्हायरल

पुराची माहिती मिळताच तत्परता दाखवत पालकमंत्री अनिल बोंडेंनी मदतीची घोषणा केली. मात्र, राहण्याचे तर सोडाच पण खाण्यासाठी अन्नाचीही सोय झाली नसल्याची खंत पूरग्रस्तांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा -अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर; धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता

हा पूर इतका भयानक होता की, या पुराचा विघ्नहर्त्या गणपतीलाही सामना करावा लागला. त्यामुळेच पूरग्रस्त कुटुंबाना मदत म्हणून पहिल्या टप्प्यात 5 हजार रुपये देणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे.

Last Updated : Sep 7, 2019, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details