अमरावती :अमरावतीत इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला (5 people died in building collapse ) होता. पतीसह चार मजुरांच्या मृत्यूला लॉजमालक, नूतनीकरण करून ती इमारत राहण्यायोग्य होईल, असे सांगणारा खासगी अभियंता तसेच मनपा प्रशासनातील संबंधित अधिकारी कारणीभूत असल्याची तक्रार शिल्पी परमार यांनी शुक्रवारी कोतवाली पोलिसांत ( manager wife complaint in Police ) नोंदविली. याप्रकरणी यापूर्वी दाखल मूळ एफआयआरमध्येच त्यांचा जबाब नोंदविला जाईल, असे ठाणेदार नीलिमा आरज म्हणाल्या.
चार मजुरांचा मृत्यू :रविवारी प्रभात चौक येथील राजेंद्र लॉजची इमारत पडून व्यवस्थापक रवी परमार यांच्यासह चार मजुरांचा मृत्यू झाला ( Rajendra Lodge building collapsed ) होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळी रवी परमार यांची पत्नी शिल्पी यांनी ठाणेदार नीलिमा आरज यांची भेट घेतली. राजेंद्र लॉजचे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम पाडल्यानंतर संपूर्ण ढिगारा राजदीप बॅग हाऊसच्या स्लॅबवर पडून होता. त्या अतिभारामुळे ती इमारत कोसळली, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. याशिवाय तळमजल्यावरील पाचही दुकाने पाडून टाकण्यात यावीत, अशी नोटीस महापालिकेने दिली असताना अंमलबजावणी झाली की नाही, हे महापालिकेच्या अभियंत्यानी, संबंधितांनी का पाहिले नाही, असा सवाल करून पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची हाराकिरीदेखील तितकीच कारणीभूत असल्याचे परमार म्हणाल्या. ही संपूर्ण इमारत अतिशिकस्त झाली असताना व पाचही दुकाने खाली झाली असताना ती दुकाने महापालिकेने का पाडली नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.