अमरावती :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 पुण्यस्मरण निमित्त पहिले राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीत करण्यात आले आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अजून प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यस्तरीय संमेलन संपन्न होणार (tukdoji maharaj vichar Sahitya sammelan) आहे. येथील अभियंता भवन येथे 4 व 5 फेब्रुवारी दरम्यान सेवा फाऊंडेशन व राष्ट्रधर्म युवा मंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजालारावती जिल्हा यांच्यावतीने या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले (Sammelan In Amravati) आहे.
राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन :अमरावती जिल्ह्यातील यावली ही राष्ट्रसंतांची जन्मभूमी आहे. त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होऊन सर्व घटकांपर्यंत पोहोचावा, या मुख्य हेतूने या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीने दिली आहे. हे राज्यस्तरीय संमेलन शिस्तबद्ध व सुरळीत पार पाडावे यासाठी मार्गदर्शन समिती, आयोजन समिती, व्यवस्थापन समिती, भोजन समिती, स्वच्छता व शिस्त समिती, सामुदायिक ध्यान प्रार्थना समिती, पाणी व वाहन समिती अशा विविध समित्यांचे गठन लवकरच होणार असून वेरुळकर गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीच्या दरम्यान ही माहिती देण्यात (Sahitya sammelan in amravati) आली आहे.