महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारतातील पहिला स्काय वॉक प्रकल्प अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये

चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्काय वॉकचा समावेश करण्यात आला असून ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा भारतातील पहिला आणि जगातील तिसरा गगन भरारी पूल असणार आहे.

By

Published : Sep 17, 2019, 12:45 PM IST

स्काय वॉक प्रकल्प

अमरावती- चिखलदऱ्यात आता स्काय वॉक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्काय वॉकचा समावेश करण्यात आला असून पर्यटकांच्या दृष्टीने हे एक विशेष आकर्षण ठरणार आहे.

चिखलदऱ्यात लवकरच सुरू होणार स्काय वॉक प्रकल्प

चिखलदऱ्यातील गोराघाट पॉईंटपासून ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्काय वॉकसाठी ५०० मीटरचा हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. याचे जलद गतीने काम देखील सुरु असून हा भारतातील पहिला आणि जगातील तिसरा गगन भरारी पूल आहे. दोन मोठया टेकड्यांना स्काय वॉक ने जोडण्यात येणार आहे. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा आहे. यामुळे पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. स्काय वॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सिडको द्वारा विकसीत करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदऱयामध्ये देशातून पर्यटकांची गर्दी वाढेल.

ABOUT THE AUTHOR

...view details