अमरावती - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, शनिवारी रात्री चांदूर बाजार परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील मेघा नदीला पूर आला आहे. विशेष म्हणजे या मोसमातील हा पहिलाच पूर आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. .
अमरावतीच्या चांदूरबाजारमध्ये मुसळधार; मेघा नदीला आला पहिला पूर - मुसळधार पाऊस
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे सावट असताना शनिवारी रात्री वरूण राजाचे आगमन झाले. विजांच्या कडकडाडासह रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली.
अमरावतीमधील मेघा नदीला आला पहिला पूर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे सावट असताना काल रात्री वरूण राजाचे आगमन झाले. विजांच्या कडकडाटासह रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चांदुर बाजार येथील कोरडी पडलेली मेघा नदी पूर सदृश झाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.