अमरावती -शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश बाबाराव घारड यांच्यावर वरुड येथील मुलताई चौकात शनिवारी रात्री मुलताई चौक येथे गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे वरुड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Firing on Shvsena Worker : अमरावतीच्या वरुडमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गोळीबार; आरोपी फरार - वरूडमध्ये गोळीबार
शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गोळ्या झाडल्या प्रकरणात राहुल राजू तळस आणि अन्य एका युवकाचा हात असल्याचे समोर आले आहे. पोलीस या दोघांचाही शोध घेत आहे. या घटनेचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख
नागपुरात उपचार सुरू - शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गोळ्या झाडल्या प्रकरणात राहुल राजू तळस आणि अन्य एका युवकाचा हात असल्याचे समोर आले आहे. पोलीस या दोघांचाही शोध घेत आहे. या घटनेचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली असावी असा तर्क सध्या लावल्या जात आहे. गोळीबारात जखमी झालेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश गारड यांच्या कमरेत गोळी शिरल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
Last Updated : Apr 24, 2022, 11:16 AM IST