अमरावती- मेळघाटच्या पायथ्याशी असणार्या अचलपूर तालुक्यातील वडूरा येथे राहूल वैघ यांच्या साडेतीन एकरातील केळीच्या पिकाला रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीमूळे शेतात असलेले केळीचे पीक, ड्रिप सेट, अडीच हजार बांबुसह इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये राहूल वैद्य यांचे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अमरावती: अचलपूर तालुक्यातील वडूरा येथे केळीच्या शेताला आग; दहा लाख रुपयांचे नुकसान - Melghat
शेताला लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आगीमूळे कुठल्याही प्रकारच्या जिवीत हानीची माहिती प्राप्त झालेली नाही
डूरा येथे केळीच्या शेताला आग लागली
शेताला लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. आगीमूळे कुठल्याही प्रकारच्या जिवीत हानीची माहिती प्राप्त झालेली नाही. आग लागून शेतकर्याच्या उभ्या पिकाचे मोठे नूकसान झाले आहे. शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी राहुल वैद्य यांनी केली आहे.