महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या सुलतानपुर जंगलाला आग, अथक प्रयत्नानंतर विझवण्यात यश - आग

चांदुररेल्वे- अमरावती मार्गावरून टेकडीच्या मागे भीषण आग लागली असल्याचे दिसत होते. १० ते १५ वनकर्मचाऱ्यांनी ब्लार मशीन आणि झाडांच्या पानांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविले.

अमरावतीच्या सुलतानपुर जंगलाला आग

By

Published : May 4, 2019, 3:29 AM IST

अमरावती- पिंपळखुठा वांवर्तुळ क्षेत्रात येणाऱ्या सुलतानपुर जंगलात शुक्रवारी आग लागली. आगीची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. एक हॅक्टर जंगलात आग पसरली होती.

सुलतानपुर जंगलाला आग

सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कोणीतरी सुलतानपूर जंगलात सुकलेल्या झाडांना आग लावण्यात आली. काही वेळातच ही आग जंगलात पसरली. चांदुररेल्वे- अमरावती मार्गावरून टेकडीच्या मागे भीषण आग लागली असल्याचे दिसत होते. वडाळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी भुंबर यांच्यासह पोहऱ्याचे वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे, चिरोडीचे प्रभारी वर्तुळ अधिकारी शेंडे आग लागलेल्या ठिकाणी पोचले. यावेळी १० ते १५ वनकर्मचाऱ्यांनी ब्लार मशीन आणि झाडांच्या पानांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमुळे जंगलातील बिबट, हरीण, नीलगाय सैरावैरा झालेत. ही आग जाणीवपुर्वक लावण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details