अमरावती : जिल्ह्यातील धारणी शहरातील बाजार पेठेला आज (शुक्रवारी) पहाटे चार वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीमध्ये दहा ते पंधरा दुकाने जळून खाक झाली आहेत. या दुकानांमध्ये चार मोठ्या कपड्यांच्या दुकानांचा समावेश असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते आहे. आगीची माहिती मिळताच धारणी नगरपंचायतीचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर काही वेळात ही आग आटोक्यात आणण्यात आली.
अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरातील एसटी बसस्थानक परिसरात असणाऱ्या बाजारपेठेतील एका हॉटेलला अचानक आग लागली. त्यामुळे या दुकानाच्या रांगेत असलेल्या इतर दुकानेही पेटत गेली. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीत बाजारपेठेत मध्यभागी असलेली चार कापड दुकाने, चप्पल दुकान आणि हॉटेल भस्मसात झाले आहे. मात्र, नेमकी कशामुळे आग लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ऐन दिवाळीच्या हंगामात दुकानाला लागलेल्या आगीमुळे व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत.
घुंगरू बाजाराच्या दिवशी लागली आग..