अमरावती- अचलपूर तालुक्यातील सावली गावातील शेतकरी गजानन गावंडे यांच्या शेतात आग लागून २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री १ च्या सुमारास घडली.
शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान; अमरावतीच्या अचलपूरमधील घटना - अग्निशमन दल
शेतकरी गजानन गावंडे यांच्या शेतात शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या शेतातील २ लाख रूपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे.

शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
शेतात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
शेतकरी गजानन गावंडे यांच्या शेतात शनिवारी रात्री अचानक आग लागली. त्यानंतर अगदी काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा चमू घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत गजानन गावंडे यांच्या शेताची राख रांगोळी झाली होती. दरम्यान, ही आग कुणी लावली, की शॉर्ट सर्किटमुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.