अनर्थ टळला; तिवसा ग्रामीण रुग्णालयात लागली आग, रुग्णांची उडाली तारांबळ - शॉर्टसर्किट
तिवसा येथील शासकीय ग्रामिण रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून वीज प्रवाह करणारी तार जळाली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गॅस किटच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.
आग लागल्यानंतर रुग्णांची उडालेली तारांबळ
अमरावती - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. त्यातच तिवसा येथील शासकीय ग्रामिण रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून वीज प्रवाह करणारी तार जळाली. रात्री 10:30 वाजता अचानक विजेच्या बोर्डामध्ये स्फोट होऊन रुग्णालयात आगीमुळे धूर पसरला. सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र आगीमुळे काहीवेळ रुग्णांची व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.