अमरावती- शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव पेठ येथे पहाटे साडेचार वाजता शॉर्ट सर्किटने आग लागून सात दुकाने व पोलीस चौकी जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे..या आगीमुळे दुकान व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी दोन अग्निशमन बंबाला पाचारण करून ही आग आटोक्यात आणण्यात आली.
अमरावतीच्या नांदगाव पेठेत पहाटे लागलेल्या आगीत सात दुकाने जळून खाक - अमरावती
नांदगाव पेठेत लागलेल्या आगीत सात दुकाने जळून खाक झाली. आगीत व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे.

अमरावतीच्या नांदगाव पेठेत पहाटे लागलेल्या आगीत सात दुकाने जळून खाक
अमरावतीच्या नांदगाव पेठेत पहाटे लागलेल्या आगीत सात दुकाने जळून खाक
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठी बाजारपेठ आहे. शनिवारी पहाटे साडेचार वाजता शॉर्ट सर्किटमूळे येथे मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. दरम्यान, सकाळी पाच वाजता अमरावतीला भाजी मंडईत जाणाऱ्या काही लोकांना ही आग दिसली असता हा प्रकार समोर आला.
आग एवढी भीषण होती की यात सात दुकाने व पोलीस चौकी यामध्ये जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 वाहनाना घटनास्थळी पाचारण करून आग आटोक्यात आणली आहे.