अमरावतीत एकाच गावात जनावरांच्या आठ गोठ्यांना आग.. लाखोंचे शेतीपयोगी साहित्य खाक - अमरावती आग
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकदरा या गावात आज दुपारच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत एका गाईंसह वासराचा होरपळून मृत्यू झाला. एकापाठोपाठ ८ गोठ्यांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे वैरण, बांधकाम व शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले.
अमरावती - अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकदरा या गावात आज दुपारच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत एका गाईंसह वासराचा होरपळून मृत्यू झाला. एकापाठोपाठ ८ गोठ्यांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे वैरण, बांधकाम व शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले.
आज दुपारच्या सुमारास एकदरा येथे गावालगतच्या नागमोते लेआऊट मधील जनावरांच्या ८ गोठ्यांना अचानक आग लागली. दुपारची वेळ असल्याने सर्वत्र सामसूम होते. आग लागली त्यावेळी गोठ्यात जनावरे बांधलेली होती. गोठ्यांमधून धूर निघत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. लागलीच गावकऱ्यांनी गोठ्यांकडे धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आगीची माहिती वरुड व शेंदुर जनाघाट येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविली.