अमरावती- जिल्ह्यातील अंजनगाव परतवाडा मार्गावर सावळी धातुरा गावालगत संत्रा मंडीला भीषण आग लागली आहे. या आगीत चार हजार कॅरेट संत्रा जळून खाक झाला आहे.
अमरावतीत संत्रा मंडीला आग; चार हजार कॅरेट संत्रा जळून खाक - farming in amravati
अमरावती जिल्ह्यातील सावळी धातुरा गावालगत असलेल्या ऋषी उपल यांच्या संत्रा मंडीला भीषण आग लागली असून यात चार हजार कॅरेट संत्रा जळून खाक झाला. या आगीमुळे जवळपास 40 लाखांचे नुकसान झाले आहे.
fire in amravati
ऋषी उपल यांच्या मालकाची ही संत्रा मंडी असून या आगीत ट्रकही जळाल्याने जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉट सर्किट झाल्याने लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.
हेही वाचा-अमरावतीत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक; दोन गंभीर जखमी