अमरावती- शहरातील जुन्या महामार्गावर असणाऱ्या हॉटेल लॉर्डसला आग लागली. या आगीमध्ये हॉटेलचा मागच्या बाजूचे 2 मजले जळून खाक झाले आहेत. आज (सोमवारी) सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली होती.
हेही वाचा - तपोवनात पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचा १२८ वा जयंती उत्सव उत्साहात
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. या आगीत हॉटेलमधील खुर्च्या, टेबल, ताटं, एलसीडी, दारूच्या बाटल्या जळाल्या आहेत. हॉटेलचे दोन्ही मजले जळाले असून हॉटेलच्या टेरेसलाही या आगीची झळ बसली आहे.
हेही वाचा - बहिरमच्या यात्रेत मातीच्या हंडीत शिजवतात मटण; खवय्यांची गर्दी
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 बंबाद्वारे ही आग नियंत्रणात आणण्यात आली. या आगीत हॉटेलच्या मागील बाजूला नव्याने बांधण्यात आलेली 2 मजली इमारत पूर्णतः जळाली असून या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.