अमरावती -दर्यापूर येथील श्री बालाजी जिनींगला आज दुपारी आग लागली आहे. आगीची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे. आग वारंवार लागत असल्याने यामागे घातपात असल्याच्या चर्चेला दर्यापुरात उधाण आले आहे.
अमरावतीच्या दर्यापूर येथील जिनींग प्रेसला आग; घातपात असल्याचा संशय
शनिवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास या जिनींगला अचानक आग लागल्याने यात लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. या आगीमध्ये मशनरी साहित्यसुद्धा जळालेले आहे.
शनिवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास या जिनींगला अचानक आग लागल्याने यात लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. या आगीमध्ये मशनरी साहित्यसुद्धा जळालेले आहे. वरवर आग लागत असल्याने जिनींग मालकही हतबल झालेत.
आग विझवण्यासाठी दर्यापूरसह जवळच्या तालुकामुख्यालयातून पाठवलेल्या ४ अग्निशामक गाड्यांनी आग नियंत्रणात आणली. जिनींगच्या संचालकांना कळताच त्यांनी त्वरित नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. घटनेने परिसरात बराच वेळ खळबळ उडाली होती. या रोडवरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. पोलिसांना पाचारण करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.