महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; शाळेला ठोठावला तब्बल 25 हजारांचा दंड - कोरोना विषाणू कारवाई

एसडीएफ शाळेला दंडाची रक्कम तीन दिवसाच्या आत महापालिकेकडे भरावी लागणार असून, महापालिकेने रकमेचा उपयोग कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध उपाययोजनांसाठी करावा, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून, शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

amravati SDF school penalty
शासनाचा नियम मोडणाऱ्या एसडीएफ शाळेला 25 हजाराचा दंड

By

Published : Mar 22, 2020, 3:02 AM IST

अमरावती -कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा बंद करण्याचे आदेश असतानाही शाळा सुरू असल्याचे 18 मार्चला निदर्शनास आले होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 35 अन्वये एसडीएफ या शाळेला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बजावला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; शाळेला तब्बल 25 हजारांचा दंड ठोठावला

हेही वाचा -कोरोना दहशत : वसुंधराराजे, दुष्यंत सिंह अन् 96 खासदारांनी सोडला सुटकेचा श्वास

एसडीएफ शाळेला दंडाची रक्कम तीन दिवसाच्या आत महापालिकेकडे भरावी लागणार असून, महापालिकेने रकमेचा उपयोग कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध उपाययोजनांसाठी करावा, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून, शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

एसडीएफ नावाची शाळा शहरातील वृन्दावन कॉलनीत असून, 18 मार्चला या शाळेत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात होती. यासंदर्भात उच्च शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी दरम्यान शाळेला नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. या खुलाश्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी 18 मार्चला इयत्ता दहावी या वर्गाचे नवीन पुस्तकांचे संच घेण्यासाठी काही विद्यार्थी व पालक शाळेत आले होते व त्यांना ते देण्यात देखील आले असे स्पष्ट केले होते. मात्र, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शाळेच्या अध्यक्षांनी आज शाळेत नववीची परीक्षा घेण्यात आल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.
हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details