महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Financial Fraud Amravati: पोलीस ठाण्यात तक्रार देते म्हणून महिलेने उकळले १४ लाख रुपये - पोलिसात तक्रार देण्याची धमकी

Financial Fraud Amaravati: महिलेने एका व्यक्तीस पोलिसात तक्रार करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 12 लाख 60 हजार रुपये उकळले. (threat to report to police) यानंतर ती त्या व्यक्ती जवळील रोख रक्कम, आधारकार्ड आणि पॅन कार्ड घेऊन फरार झाली. (woman absconding with cash) याप्रकरणी अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात महिला आणि तिच्या नातेवाईकाविरुध्द खंडणी, मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Financial Fraud Amaravati
Financial Fraud Amaravati

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 11:01 PM IST

अमरावतीFinancial Fraud Amaravati:पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊन येथील एका व्यक्तीकडून एका महिलेने 12.60 लाख रुपये उकळले आले. ती महिला तेवढ्यावरच न थांबता ती त्याच्याकडील 2 लाख 9 हजार 500 रुपये रोख, आधारकार्ड आणि पॅन कार्ड घेऊन पळून गेली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी ओंकार नामक फिर्यादीच्या तक्रारीवरून एक महिला व तिच्या नातेवाईकाविरुद्ध खंडणी, मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल केला.

असा आहे प्रकार:तक्रारीनुसार, फिर्यादी ओंकार नामक व्यक्तीची आरोपी महिलेसोबत एक वर्षापूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी व फिर्यादी हे एकमेकांना भेटत होते. ती फिर्यादी यांच्या कार्यालयात येत होती. आरोपी महिलेने वेळोवेळी फिर्यादी ओंकार यांना पैशाची मागणी केली. दिले नाही तर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देते, अशी धमकी दिली. त्यामुळे तिने यापूर्वी त्यांच्याकडून पाच लाख रुपये तसेच वेळोवेळी एकूण 12 लाख 60 हजार रुपये उकळले. दरम्यान, महिलेने ओंकार यांना पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली होती. नाहीतर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देते, अशी धमकी दिली.


स्टॅम्प पेपर फाडला:दरम्यान, फिर्यादीला तो ससेमिरा कायमचा टाळायचा होता. त्यामुळे दोन लाख रुपये घे व स्टॅम्पवर सही करून दे, यानंतर मला ब्लॅकमेल करू नको, असे ओंकार यांनी तिला बजावले. दरम्यान, ओंकारने 2 लाख रुपये व स्टॅम्प पेपर घेऊन राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी गेले. त्यावेळी महिला आरोपीने स्टॅम्प पेपर फाडला. तसेच ओंकार यांच्या दुचाकीच्या डिकीतील दोन लाख रुपये, 9500 रुपये रोख असलेले वॉलेट, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, अशी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन ती पसार झाली.

बुलडाण्यातही अशीच घडना घडली: मैत्री संबंधातून मित्राची फसवणूक केल्याची घटना एका महिलेकडून घडविण्यात आली होती. मैत्रीसंबंधात झालेल्या संभाषणाची क्लिप वापरुन एका व्यक्तीला महिलेने ब्लॅकमेल केले. ही घटना जुलै, 2020 रोजी बुलडाणा येथे घडली होती. संबंधित महिलेने तिच्या दोन साथीदाराच्या मदतीने 25 लाखांची रक्कम त्या व्यक्तीला मागितली. रोहिणी पवार, राहुल गाडेकर, आणि सचिन बोरडे असे आरोपींची नावे होती. देऊळगाव राजा शहरातील एका व्यक्तीची जालन्यातील रोहिणी पवार या महिलेशी मैत्री झाली. ब्युटी पार्लरसाठी रोहिणीला देऊळगाव राजा शहरात दुकान हवे होते. यातून त्या व्यक्तीची रोहिणीशी मैत्री जमली. मैत्रीत अनेकवेळा दोघांत संभाषण झाले. दोघांतील संवादाच्या क्लिपचा वापर करुन रोहिणीने त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करुन 25 लाखांची मागणी केली. पैसे दिले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. ही रक्कम चार टप्यात देण्याचे ठरले होते.

हेही वाचा:

  1. Govt Officials Fake FB Account : शाहरुख खानचा कारनामा; शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून फसवणूक
  2. Cyber Fraud : देवेंद्र फडणवीसांच्या खासगी सचिवाच्या नावे सायबर फ्रॉड; आरोपीला मिरजमधून अटक
  3. Accused Of Robbery Arrested: एक्झॉस्ट फॅनमधून दुकानात मध्यरात्री प्रवेश करून लंपास केले 10 लाख, झारखंडमधून आरोपीला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details