महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा - आमदार रवी राणा - अमरावती रवी राणा

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तर जिल्ह्यात कडकडीत बंद एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू आहे. यात अमरावती विभागीय कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू असून यावेळी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा दिला.

MLA Ravi Rana
MLA Ravi Rana

By

Published : Nov 7, 2021, 8:20 PM IST

Updated : Nov 7, 2021, 8:32 PM IST

अमरावती - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तर जिल्ह्यात कडकडीत बंद एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू आहे. यात अमरावती विभागीय कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू असून यावेळी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्या महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. त्यांनी आमदार रवी राणा यांना रडत रडत आपली व्यथा सांगितली.

यावेळी मात्र राज्य सरकार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आमदार रवी राणा यांनी सडकून टीका करत राज्य सरकार कर्मचाऱ्यांची थट्टा असल्याचे त्यांनी सांगितले. तर एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब हे बेशरम मंत्री आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला अनिल परब जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर 302 कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली. तातडीने सरकारने दखल घेतली नाही तर मी स्वतः मैदानात उरणार असल्याचे देखील राणा यांनी सांगितले.

आमदार रवी राणा
अमरावती जिल्ह्यातही एसटीची चाके ठप्प; दीड हजारांहून अधिक कर्मचारी संपावर -


एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे याप्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज अमरावती जिल्ह्यातील तबल दीड हजारांपेक्षा जास्त एसटी कर्मचारी संपावर गेल्याने एस टी ची चाके थांबली आहेत. ऐन दिवाळीच्या दिवसात कर्मचारी संपावर गेल्याने प्रवाशांना मात्र सकाळपासून बसस्थानकात ताटकळत बसावे लागत आहे. अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा ,चांदुर बाजार,मोर्शी आणि वरुड आगारातील एसटी सेवा पूर्णता बंद आहे. जिल्ह्यातील 350 पैकी केवळ 60 ते 70 बस रस्त्यावर धावत आहेत.

एस टी महामंडळच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसह एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज अमरावती जिल्ह्यातील दीड हजार कर्मचारी संपावर गेल्याने एसटीची सेवा पूर्णता खोळंबली आहे. काल भाऊबीज असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवाशी दुसऱ्या गावाला जात होते. परंतु एसटीची सेवा कोलमडली असल्याने तासनतास बसची वाट पाहत प्रवाशी आगरामध्ये उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे असलेले अमरावतीचे मध्यवर्ती बस स्थानक देखील सकाळपासून बंद आहे. या बसस्थानकातील एकही बस बाहेर पडली नसली तरी अकोला नागपूर, बुलढाणा, यवतमाळवरून येणाऱ्या बसेस मात्र दर्यापूर, चांदुर रेल्वेकडे जाताना चित्र पाहायला मिळाले.

आरक्षणाची सुविधाही ठप्प -

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गर्दी असल्यामुळे जागा आरक्षित करून अनेकजण प्रवास करण्याचे नियोजन करत आहेत. अनेक प्रवाशांना आरक्षणाची सुविधा ठप्पा असल्यामुळे त्रास करावा लागला. राजापेठ बस स्थानकावर अकोला, औरंगाबाद, बुलडाणाकडे जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गर्दीतूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे न्यायालयाचे आदेश -


सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर येण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारला तुमच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊ, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना दिले आहे. संप मागे घ्या अन्यथा ताब्यात घेण्याचे निर्देश देऊ असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आपापसात चर्चा करून ताबडतोब निर्णय कळवण्याचे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

Last Updated : Nov 7, 2021, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details