महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीतील चुनाभट्टी परिसरात हाणामारी, नगरसेवकासह दोघे जखमी - जिल्हा सामान्य रुग्णालय

अमरावतीत चुनाभट्टी परिसरात झालेल्या हाणामारीच्या घटनेत नगरसेवकासह दोघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर चुनाभट्टी परिसरात खळबळ उडाली.

हाणामारीत जखमी झालेला कुणाल सोनी

By

Published : Sep 10, 2019, 11:50 AM IST

अमरावती - शहरातील चुनाभट्टी परिसरात आज (मंगळवार) हाणामारीची घटना घडली. या घटनेत नगरसेवक प्रणित सोनी आणि गोपी बुंदेले हे दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबत दोन्ही बाजूंकडून पोलिसात तक्रार दिली आहे.

अमरावतीत चुनाभट्टी परिसरात झालेल्या हाणामारीच्या घटनेत नगरसेवकासह दोघेजण गंभीर जखमी


या घटनेनंतर चुनाभट्टी परिसरात खळबळ उडाली. नगरसेवक प्रणित सोनी यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमा झाली. प्रणित सोनी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, जिल्हा सामान्य रुग्णालयातही कार्यकर्त्यांनी गर्दी केली. गोपी बुंदेले यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - अमरावतीत बहरले 'रोझ गार्डन', रविवारी होणार लोकार्पण


प्रणित सोनी हे त्यांचे चुलत भाऊ कुणाल सोनी यांच्यासोबत जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या एका महिलेच्या दुचाकीने धडक दिली. परिसरातील बुंदेले कुटुंबीयांच्या सदस्यांनी सोनी यांना 'तुमची गुर्मी वाढली असल्याचे' म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत प्रणित सोनी जखमी झाले, असे प्रणित यांचे भाऊ कुणाल सोनी यांनी सांगितले. या उलट गोपी बुंदेले यांनी आपण स्वच्छतेबाबत तक्रार केली, म्हणून नगरसेवक सोनी यांनी आपल्याला मारहाण केल्याचे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details