अमरावती-रविवारी शहरातील विविध ठिकाणी 14 आणि धामणगाव रेल्वे शहरात 1असे एकूण 15 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या 695 वर पोचली आहे.
अमरावतीमध्ये रविवारी 15 कोरोना रुग्ण वाढले; एकूण संख्या 695 वर - अमरावती कोरोना केसेस
अमरावती जिल्ह्यात रविवारी 15 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 695 वर पोहोचली आहे.
15 रुग्णांमध्ये जुनी वस्ती बडनेरा परिसरात 65 वर्षीय पुरुष, अच्युत महाराज रुग्णालय येथील 39 वर्षीय महिला, मताखिडकी परिसरात 50 वर्षीय पुरुष, अशोकनगर परिसरात 50 वर्षीय महिला, चावरे नगर परिसरात 40 वर्षीय महिला, छाया नगर परिसरात 15 वर्षीय बालक, साबणपुरा परिसरात 23 वर्षीय महिला, प्रवीण नगर परिसरात 60 वर्षीय महिला, दरोगा प्लॉट परिसरात 57 वर्षीय महिला, बजरंग टेकडी परिसरात 60 वर्षीय महिला, शारदानगर परिसरात 35 वर्षीय पुरुष, पन्नालाल नगर परिसरात एकाच कुटुंबातील 58 वर्षीय पुरुष आणि 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
धामणगाव रेल्वे शहरात 44 वर्षीय पुरुषाला कोरोना झाला आहे. अमरावती शहरातील जवळपास सर्वच भागात कोरोनाचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील चौदाही तालुक्यत कोरोना रुग्ण आढळले आहेत. गत काही दिवसात कोरोना वाढीचा वेग वाढला असून जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाची भीती वाढली आहे.