अमरावती Amravati Accident- ड्युटीवर परतणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे गाडगेनगरस्थित गाडगेबाबा मंदिरानजीक घडली आहे. प्रियंका बोरकर (२६, रा. शेगाव, अमरावती) असे अपघातात ठार झालेल्या महिला पोलीस अंमलदाराचे नाव आहे. मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेली महिला पोलिस कर्मचारी जागेवरच ठार झाली. दारूच्या नशेत धडक देणाऱ्या वाहन चालकास पोलिसांनी अटक केली.
Amravati Accident: मद्यपी दुचाकीस्वारानं उडवल्यानं महिला पोलिसाचा मृत्यू, आरोपीला अटक
Amravati Accident महिला पोलीस कर्मचारी दुचाकीवरून जात असताना दारू प्यायलेल्या दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली. हा अपघात रविवारी पहाटे झाला असून त्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
Published : Sep 24, 2023, 8:59 PM IST
|Updated : Sep 24, 2023, 9:41 PM IST
अशी आहे घटना-प्रियंका बोरकर या ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (सीआरओ) कार्यरत होत्या. सर्व पोलिस ठाण्यातून नोंद गुन्ह्याची माहिती घेऊन त्या रात्री दोनच्या सुमारास ड्यूटी संपवून पती सागर रमेश सिरसाट (रा. शेगाव) यांच्यासह मोपेडने घराच्या दिशेने शेगाव नाक्याकडे जात होत्या. त्यावेळी गाडगेबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर मागून आलेल्या भरधाव दुचाकीनं (एमएच १२ आर डब्ल्यू ७५३०) त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. यात प्रियंका यांच्या डोक्याला व शरीराच्या अन्य भागाला जबर मार लागला. त्यामुळे घटनास्थळीच त्यांना अतिरक्तस्राव झाला. पती सागर सिरसाट यांनी पत्नी प्रियंका हिला काही लोकांच्या मदतीने तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, अतिरक्तस्रावाने प्रियंका यांचा रविवारी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- आरोपीला घटनास्थळीच अटक-सागर सिरसाट यांच्या दुचाकीला मागून धडकताच दुचाकीस्वार गौरव गोपाल मोहोड (३३, रेखा कॉलनी) हादेखील दुचाकीसह खाली कोसळला. तो मद्यधुंद अवस्थेत तेथेच पडून राहिला. गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- 2017 पासून होत्या कार्यरत- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका बोरकर या सन 2017 मध्ये अमरावती ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवर पोलीस अंमलदार म्हणून रुजू झाल्या होत्या. तर गेल्या एक वर्षापासून त्या ग्रामीण मुख्यालयी नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. ड्यूटीवर परतणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनं पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
हेही वाचा-