अमरावती : प्राचीन काळी बौद्धविहारे हे ज्ञानाची केंद्र होती. परंतु, काळाच्या ओघात बुद्ध विहारांवर मोठ्या प्रमाणात धर्मांधाची आक्रमणे झाले. त्यामुळे ही बौद्धविहारे नष्ट झाली. एकट्या बिहारमध्ये ८४ हजार बौद्ध विहारे होती असा, इतिहास आहे. आता पुन्हा नव्याने गावोगावी बौद्ध विहारे निर्माण झाली आहेत. बौद्ध विहारे ही ज्ञानाच्या कक्षेत यावीत. ती ज्ञानाची केंद्र व्हावी यासाठी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका नि:शुल्क अभ्यास चळवळ तसेच विहार जोडो समाज जोडो या संकल्पनेवर आधारित अभ्यासिकेची सुरवात पुण्यात करण्यात आली आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेद्वारा भारतातील पहिला अभ्यास यात्रेचे राज्यभरात आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील भिडे वाडा येथून या अभ्यासाचे शुभारंभ झाला आहे. तसेच या यात्रेचा समारोप 29 जानेवारीला वर्धा जिल्ह्यात आर्वी येथे होणार आहे.
अभ्यास यात्रेचा असा राहील मार्ग : अमरावती जिल्ह्यातून अभ्यास यात्रेची सुरुवात दुपारी २ वाजता झाली. अभ्यासिकेचे 50 ते 60 विद्यार्थी , समन्वयक यांच्यासह ही अभ्यास यात्रा अंजनसिंगी सांगुलवाडा चांदुर रेल्वे मार्गाने मार्गक्रमण करून धामणगाव रेल्वे येथे मुक्कामी राहील. 27 जानेवारीला धामणगाव येथून यात्रा पुन्हा सुरू होऊन वरोरा, चंद्रपूर मार्गे सिंधीवाही येथे रात्रीच्या मुक्कामी पोहोचेल. 28 जानेवारीला शिंदेवाही इथून सकाळी आठ वाजता यात्रा पुढील प्रवासासाठी निघेल. ब्रह्मपुरी धारगाव शहापूर मार्गक्रमन करून रात्री नागपूर येथे मुक्कामी पोहोचेल.