अमरावतीत वीज पडून बाप-लेकाचा जागीच मृत्यू;चांदुर बाजार तालुक्यातील घटना - अमरावती लेटेस्ट न्यूज
चांदूर बाजार तालुक्यात गुरुवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान दिपक नारायण कावनपूरे आणि मुलगा सुमित हे दुचाकीवरून ते गावाकडे जात होते. जोरदार पाऊस सुरू असल्याने पावसापासून बचावासाठी ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली थांबले. मात्र, काही वेळातच झाडावर वीज कोसळली. यात झाडाखाली उभे असलेल्या बाप-लेकाचा मृत्यू झाला.
![अमरावतीत वीज पडून बाप-लेकाचा जागीच मृत्यू;चांदुर बाजार तालुक्यातील घटना father and son killed in lightning strike amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8758273-1002-8758273-1599784894080.jpg)
अमरावती -पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या बाप-लेकाचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना चांदुर बाजार तालुक्यातील दहिगाव पूर्णा या गावाच्या परिसरात घडली. नारायण कावनपुरे (वय 40) आणि सुमित दीपक कावनपुरे (वय 16) असे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या बाप लेकाची नाव आहे.
चांदूर बाजार तालुक्यात गुरुवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान दीपक नारायण कावनपूरे आणि मुलगा सुमित हे दुचाकीवरून ते गावाकडे जात होते. जोरदार पाऊस सुरू असल्याने पावसापासून बचावासाठी ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली थांबले. मात्र, काही वेळातच झाडावर वीज कोसळली. यात झाडाखाली उभे असलेल्या बाप-लेकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.