महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हरभरा पिकाची नोंद असलेला सातबारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत

शासनातर्फे तुरीची नोंदणी तारीख संपल्यानंतर हरभऱ्याची नोंदणी सुरू झाली. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने हरभऱ्याची नोंद करणे स्थानिक खरेदी-विक्री संघात बंद झाले होते.

farmers tension raised because not getting  land record certificate
हरभरा पिकाची नोंद असलेला सातबारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत

By

Published : Apr 5, 2020, 8:49 AM IST

अमरावती - शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यासाठी शासनाने 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, हरभऱ्याचा पेरा असलेली नोंद असणारा सातबारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पचाईत झाली आहे.

शासनातर्फे तुरीची नोंदणी तारीख संपल्यानंतर हरभऱ्याची नोंदणी सुरू झाली. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने हरभऱ्याची नोंद करणे स्थानिक खरेदी-विक्री संघात बंद झाले होते. पुन्हा शासनाने हरभऱ्याच्या खरेदीबाबत नोंदी सुरू केल्या आहेत, त्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहेत.

लॉकडाऊन सुरू असल्याने तलाठी कार्यालय, सेतू कार्यालये बंद आहेत. हरभरा पिकाची नोंद असणारा सातबारा तलाठी मुख्यालयात सुद्धा मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे हरभऱ्याच्या नोंदी करण्यासाठी लागणारा सातबारा मिळवण्याकरिता शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली. याकडे जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details