अमरावती :महाबळेश्वर प्रमाणे मेळघाटात देखील स्ट्रॉबेरीचे उत्पादनघेणे शक्य असल्याचे श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाच्या प्रयोगानंतर स्पष्ट झाल्याने गत आठ वर्षांपासून मेळघाटातील शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायला लागले (Farmers started producing strawberries in Melghat) आहेत. विशेष म्हणजे पारंपारिक पिकांऐवजी स्ट्रॉबेरीतून शेतकऱ्यांच्या दारी समृद्धी नांदायला लागली असल्याचे चित्र मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या मोथा, खटकाली, आलाडोह आणि मडकी या गावात पाहायला मिळते आहे.
मेळघाटात अशी आली स्ट्रॉबेरी :मेळघाटातील जमिनीवर स्ट्रॉबेरी घेता येईल का ? याबाबत अमरावतीच्या श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाच्या वतीने 2014 -15 मध्ये माती परीक्षण करण्यात आले. यानंतर चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली. मेळघाटच्या जमिनीत देखील स्ट्रॉबेरी सहज येऊ शकते, हे स्पष्ट होतात. चिखलदरा तालुक्यातील पाच ते सहा गावांमध्ये एकूण 50 शेतकऱ्यांना प्रत्येकी 10 गुंठ्यावर स्ट्रॉबेरी लागवडीकरिता 100% अनुदानावर नाविन्यपूर्ण पारदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. 2015 मध्ये आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला किमान दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न झाले. यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने स्ट्रॉबेरी लागवड सुरू (Farmers started producing strawberries) केली.
मेळघाटात स्ट्रॉबेरीचे उत्पादन, प्रतिक्रिया देताना गजानन शनवारे, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, मोथा महाबळेश्वर येथून रोपे :मेळघाटातील चार ते पाच गावातील शेतकरी थेट महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोप बोलवतात. एका रूपासाठी सात रुपये आठ रुपये आणि नऊ रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागते. यावर्षी मी एकूण सात हजार रोप बोलावली होती. आम्ही महाबळेश्वर येथील शेतकऱ्यांना ऑनलाइन पेमेंट करतो. आणि त्यानंतर ते आम्हाला ट्रक मधून रोप पाठवतात. चार ते पाच गावातील आठ,दहा शेतकरी हा ट्रक बोलवीत असल्यामुळे आम्हाला ते परवडते असे देखील गजानन शनवारे यांनी सांगितले.
लागवडीसाठी 50 हजार खर्च :दहा गुंठे शेतामध्ये स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करण्यासाठी चाळीस हजार रुपये लागतात. त्यांच्या मशागतीसह इतर खर्चावर दहा हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपये खर्च येतो, अशी माहिती मेळघाटातील स्ट्रॉबेरीचे प्रमुख केंद्र असलेल्या मोथा येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी गजानन शनवारे यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना दिली. नोव्हेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केल्यावर डिसेंबरच्या अखेरीस स्ट्रॉबेरीने शेत लाल होऊन जाते. स्ट्रॉबेरी साठी पाणी देखील कमी लागते, असे गजानन शनिवारी यांनी (Strawberries In Melghat) सांगितले.
गव्हापेक्षा स्ट्रॉबेरी फायदेशीर :एक हेक्टर जमिनीवर येणाऱ्या गव्हाद्वारे आम्हाला 60 हजार रुपये उत्पन्न मिळते. मात्र स्ट्रॉबेरीसाठी केवळ दहा गुंठे जमीन गुंतवून 60 हजार रुपये मिळतात. यामुळे गव्हापेक्षा स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणे, आम्हाला फायदेशीर ठरते, असे देखील गजानन शनवारे यांनी सांगितले.
पर्यटकांमुळे जागेवरच विक्री :चिखलदरा या पर्यटन स्थळाला हजारो पर्यटक भेट देतात. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी चिखलदऱ्यात असते. चिखलदराच्या आधीच लागणारे आमच्या मोथा गावात हॉर्स रायडिंग आणि बाईक रायडिंग साठी शेकडो पर्यटक थांबतात. या ठिकाणी 40 ते 50 रुपये पाव या भावाने मी स्ट्रॉबेरीची विक्री करतो. मोथासह चिखलदऱ्यात देखील स्ट्रॉबेरीची चिल्लर विक्री होते. यातून बराच नफा होत असल्याचे गजानन शनवारे यांनी सांगितले. जर अपेक्षेपेक्षा अधिक स्ट्रॉबेरी चे उत्पादन झाले तर परतवाडा, अमरावती आणि नागपूरला स्ट्रॉबेरी पाठवतो. ठोक विक्री पेक्षा चिल्लर विक्रीतच अधिक नफा असल्याचेही गजानन शनवारे यांनी (producing strawberries in Melghat) सांगितले.
तर अधिक फायदा :अमरावतीच्या श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाने चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्ट्रॉबेरी चे उत्पादन घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना प्रवृत्त केले होते . सुरुवातीला बऱ्याच शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यात पुढाकार दाखवला होता. स्ट्रॉबेरीची लागवड थोडीशी खर्चिक आणि किचकट असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुर्दैवाने स्ट्रॉबेरीचा नाद सोडून दिला आहे . मात्र पारंपारिक पिकांपेक्षा स्ट्रॉबेरीचे उत्पादन अतिशय फायदेशीर असून या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली, तर सर्व शेतकरी मिळून स्ट्रॉबेरीसाठी चांगली बाजारपेठ देखील शोधू शकतात. या भागातील सर्व स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी एकत्र आले, तर सर्वांचाच मोठा फायदा होईल, असा विश्वास देखील गजानन शनवारे यांनी व्यक्त (Farmers in Melghat) केला.