अमरावती- गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी तालुक्यातील हजारो हेक्टर संत्री जळाली होती. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली संत्री जळूनही शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली नाही. त्यामुळे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी एका संत्र्याच्या झाडाला 5 हजार रुपये मदत द्यावी, तसेच विविध मागण्यांसाठी बुधवारी युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेसच्या वतीने कृषीमंत्र्यांच्या घरावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंडन करून आंदोलकांनी कृषिमंत्र्यांचा निषेध केला.
कृषिमंत्री अनिल बोंडेंच्या घरासमोर शेतकरी संघटना व काँग्रेसचा मोर्चा - वरुड
वरुड येथे हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. घंटानाद, मुंडन आंदोलन करून आंदोलकांनी यावेळी कृषीमंत्र्यांचे पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला.
वरुड येथे हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. घंटानाद, मुंडन आंदोलन करून आंदोलकांनी यावेळी कृषीमंत्र्यांचे पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला.
यावेळी माध्यमांशी बोलताना आंदोलक विक्रम ठाकरे म्हणाले, वरुड, मोर्शी या भागाची विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कॅलिफोर्निया 50 टक्के नष्ट झाला आहे. यासाठी कृषीमंत्री हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे वाळलेल्या प्रत्येक संत्र्याच्या झाडाला 5 हजारांची मदत कृषीमंत्र्यांनी द्यावी, अशी मागणी यावेळी ठाकरेंनी केली.